धक्कादायक! गोंदियातील 'या' आदर्श गावातील नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवली पाठ - गोंदियात लसीकरण नाही
🎬 Watch Now: Feature Video
गोंदिया :- सावरी हे जिल्ह्यातील गाव आदर्श गाव आहे. पण गावात जनजागृतीचा अभाव असल्याने लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. प्रशासनाने गावात अनेकदा लसीकरण शिबीर आयोजित करूनही अद्याप एकाही व्यक्तिने लस टोचवून घेतलेली नाही. त्यामुळे गावात कोरोनाचा उद्रेक झाल्यास काय करायचे? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 'गाव तसे चांगले मात्र समस्यांने टांगले' ही म्हण आपन नेहमी एकतोय. मात्र गाव जर आदर्श असेल तर त्या गावात समस्या नसतील असे तुम्हाला वाटेल. मात्र, सावरी याला अपवाद आहे. आठ हजार लोकसंखेच्या गावात एकाही व्यक्तिने लस न घेणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. सावरीच्या आरोग्य केंद्रावर आरोग्य विभागाचे कर्मचारी लसी घेवून बसतात. मात्र एकही गावकरी लसीकरणासाठी भटकत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. मागील चार महीन्यात फक्त पाचशे फ्रंटलाईन वर्करनीच कोरोना लस घेतली आहे. तर आरोग्य प्रशासनाकडून लसीकरणाबाबद जनजागृती करण्यात येत असली तरी गावातील नागरीकांकडून कोरोना लसीकरणाला खो देण्यात येत आहे.