Vinayak Raut On Nitesh Rane : नितेश राणे यांनी कायद्याला शरण जाऊन गुन्ह्याची कबुली द्यावी - खासदार विनायक राऊत - संतोष परब हल्ला प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपा आमदार नितेश राणे ( Supreme Court On Nitesh Rane Bail Application ) यांनी सरळ पोलिसांना शरण जावं आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यावी. हे माझ्यादृष्टीने एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी सांगणं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut On Nitesh Rane ) यांनी दिली आहे. ते आज लांजामध्ये बोलत होते. खासदार राऊत म्हणाले की, उगाच कायद्यापासून पळत जाऊ नका. अशा पळवाटा शोधण्यापेक्षा कायद्याला शरण जा आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली द्या, असा सल्लाही शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांना दिला आहे.