VIDEO : सातपुड्याच्या कुशीतील निंबादेवी डॅम ओव्हरफ्लो; पर्यटकांची वर्षाविहारासाठी गर्दी - सातपुड्याच्या कुशीतील निंबादेवी डॅम
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला निंबादेवी डॅम देखील ओव्हरफ्लो झाला असून, या ठिकाणी वर्षाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने निंबादेवी डॅमवर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सातपुडा पर्वतरांगेतील चिंचपाणी, मनुदेवी, वाघझिरा व निंबादेवी डॅम परिसर पर्यटकांना खुणावत आहे. याठिकाणी ट्रेकिंगसह पाण्यात डुंबण्याचा आनंद घेता येत असल्याने अनेक जण विकेंड घालवण्यासाठी येत आहेत. निंबादेवी डॅम हे जळगावातील भुशी डॅम म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे गरजेचे असताना याठिकाणी मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.