thumbnail

VIDEO: सचिन वाझे आणि मनसुख हिरेन १७ फेब्रुवारीला भेटले; सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती

By

Published : Mar 25, 2021, 1:30 PM IST

Updated : Mar 25, 2021, 1:56 PM IST

मुंबई - सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. वालचंद हिराचंद मार्ग जंक्शन येथे दोघांची भेट झाल्याचा दावा एनआयए ने केला आहे. १७ फेब्रुवारीला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी दोघांची भेट झाली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. या प्रकरणाचा तपास एन आय ए करतंय. या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसूख हिरेन हा एका मर्सडिजमध्ये बसलेल्या वाजेंना तर भेटायला गेला नाही ना, अशी शक्यता एनआयए ला आहे. कारण वाजेंकडून ताब्यात घेतलेली गाडी ही तीच आहे, ज्यात सीसीटीव्हीमध्ये मनसूख गाडीत बसताना दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज 17 तारखेचे असून गुन्ह्याची उकल होण्यास मदतीचे ठरणार आहे.
Last Updated : Mar 25, 2021, 1:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.