'जनता कर्फ्यू' : नागपूर बंद, रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी - कोरोनाव्हायरस अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6499911-thumbnail-3x2-ngp.jpg)
नागपूर - जनता कर्फ्यूमुळे नागपूर रेल्वे स्थानकावर रोजच्या तुलनेत केवळ १० टक्के प्रवासी असल्याचे बघायला मिळाले. जे प्रवासी आज नागपूरला आले आहेत, त्यांची कसून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. शहरातील बसेस, ऑटो आणि टॅक्सीसुद्धा जनता कर्फ्यूमुळे बंद असल्यामुळे प्रवाशांना घरी जाण्याकरिता अडचणींना तोंड द्यावं लागतंय. अशा अनेक प्रवाशांसोबत 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत करून नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.