Cruise Drugs Party Case : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबी उपमहासंचालकांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती, म्हणाले... - क्रुझ ड्रग्ज पार्टी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13616127-thumbnail-3x2-ncb.jpg)
मुंबई - एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आम्हाला अनेक माहिती मिळाली आहे. प्रभाकर यांची आम्ही चौकशी केली, त्यामध्ये अधिक माहिती मिळाली आहे. पूजा दलालानीने सॅम डिसूझा या मुद्द्यावर साईलने उत्तर दिले नाही, पण आम्ही जवळपास दोन दिवस ११ तास चौकशी करत होतो. आम्ही एक स्वतंत्र तपास यंत्रणा असून या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना बोलावून त्यांची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. केपी गोसावी यांच्याकडून एनसीबीला बरीच माहिती मिळू शकते. न्यायालयाकडे गोसावीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. प्रभाकर साईलने दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे आम्ही तपास करत आहोत. तसेच तपासात सात साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण टीमने क्राईम सीन रिक्रिएट केला असून काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास प्रभाकर साईलला पुन्हा चौकशीसाठी बोलावू शकतो, अशी माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.