MPSC PSI STI Exam : एमपीएससी विरोधातील विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश.. मात्र, 'इतके' विद्यार्थीच बसणार परीक्षेला - मुंबई उच्च न्यायालय
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पीएसआय - एसटीआय संयुक्त पूर्व परीक्षा ( MPSC PSI STI Exam 2021 ) घेण्यात आली होती. त्यात आयोगाकडून आलेल्या उत्तरांमध्ये काही बरोबर असलेले प्रश्नही रद्द करण्यात आले ( MPSC PSI STI Exam Incorrect Answer Sheet ) होते. त्यामुळे २ ते ३ हजार मुलांची काहीही चूक नसताना केवळ एमपीएससीने दिलेल्या चुकीच्या उत्तरांमुळे ही मुलं नापास झाली होती. यातील जवळपास ८६ मुलांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा निर्णय आज मुलांच्या बाजुने आलेला आहे. न्यायालयाने या ८६ मुलांना मुख्य परीक्षेसाठी बसण्याची मंजुरी दिलेली आहे. न्यायालयीन लढाई लढलेल्या मुलांनाच या निर्णयाचा फायदा झालाय. बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय, आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी..