VIDEO : भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा; सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची - भाजप फटकार मोर्चा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढला. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला . भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र, शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांसह सेनाभवन परिसरात दाखल झाल्याने तणाव निर्माण झाला होता.