VIDEO : ...अन्यथा या देशात केवळ मुडद्यांचं राज्य राहील - संजय राऊत - sanjay raut news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारला फटकारलंय, ते चांगलंच झालं, मात्र ते थोडं आधी व्हायला हवं होतं असं म्हणत खासदार संजय राऊतांनी केंद्रावर निशाणा साधला. अनेक राज्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. महाराष्ट्रही या भयंकर परिस्थितीशी लढतोय मात्र, केंद्राकडून पाहिजे तेवढा लसींचा पुरवठा होत नाहीए. या राष्ट्रीय आपत्तीकडे केंद्र सरकार जर गांभीर्यानं पाहत नसेल, तर याासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली पाहिजे, जेणेकरून कोणत्याच राज्यावर अन्याय होणार नाही, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सर्वांनी राजकारण बाजुला ठेवून कोरोनाविरोधात काम केलं नाही, तर या देशात केवळ मुडद्यांचं राज्य राहील, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.