...अन् ट्रकवर उभारले चालते फिरते मंगल कार्यालय - पुणे जिल्हा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात चालते फिरते मंगल कार्यालयाची संकल्पना पुढे आल्याच पाहायला मिळत आहे. शहरातील भोसरी परिसरात राहणाऱ्या दयानंद दरेकर यांनी ही हटके संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. दरेकर त्यांनी साकारलेल्या मंगल कार्यलयात विद्यूत रोषणाई, वातानुकूलित हॉल, साउंड सिस्टिम सुविधा देण्यात आल्या आहेत. तब्बल 50 लाख खर्च करून त्यांनी मंगल कार्यालयाच स्वप्न पूर्ण केले आहे.