Raj Thackeray Thane : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतला 'मामलेदार मिसळ'चा आस्वाद - मामलेदार मिसळ ठाणे
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) आणि ठाण्याचे जुने नाते आहे. अगदी लहानपणापासून राज ठाकरे यांना ठाण्यात मामलेदारची मिसळ ( Mamledar Misal ) आवडते. ते जेव्हा जेव्हा ठाण्यात येतात तेव्हा ते मामलेदार मिसळचा आनंद घ्यायला विसरत नाही. अनेकदा ते मिसळ पार्सल मागवून घेतात, आजही त्यांचे हे मिसळ प्रेम पाहायला मिळाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठीक ठिकाणच्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी आज (सोमवारी) भिवंडीतील मनसे कार्यालयाचे उद्धाटन करुन तेथील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.