अठरापगड जातींना घेऊन आमदार गोपीचंद पडळकरांचे सांगलीत चक्काजाम आंदोलन - आमदार गोपीचंद पडळकर सांगली बातमी
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - ओबीसी समाजातील अठरापगड जातीच्या विविध भटक्या घटकांना घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आनंदोलनात लक्ष वेधलं ते भटक्या समाजातील घटकांनी. पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांच्या गजरात यावेळी आपली कला सादर केली. शहरातील पुष्पराज चौक याठिकाणी झालेल्या आंदोलनात आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.