VIDEO : ...आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला केला सॅल्यूट - यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केला सॅल्यूट
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत असतो. मात्र, राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज चक्क आपल्या ताफ्यातील वाहन चालक किंन्हाके यांना सॅल्युट केला. मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. मंत्री यशोमती ठाकूर यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करत असतात. मारुती यांची आज सेवानिवृत्ती आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचे औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव मंत्री ठाकूर यांनी केला.