Gulabrao Patil Reply on MNS : संदीप देशपांडे आधीचे शिवसैनिक - मंत्री गुलाबराव पाटील - संदीप देशपांडे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14178337-802-14178337-1642076590783.jpg)
जळगाव - मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याच्या आरोपाला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मराठी माणसाच्या हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना झाली असून महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख नसते तर मुंबईत मराठीचा एकही टक्का राहीला नसता, हे संदीप देशपांडे मान्य करतील कारण तेही आधीचे शिवसैनिक असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तसेच ते म्हणाले, ज्या राज्यात जी भाषा बोलली जाते त्या भाषेत बोर्ड लावणे यात दुःख न मानता मराठी ही आपली अस्मिता आहे. त्यामुळे बोर्ड हे मराठीतच ( Marathi Board On Shops ) लागले पाहिजे.