VIDEO : 'अरे चहा प्यायचाय बनव बरं चांगला...'; जेव्हा बच्चू कडूंना चहाची तलफ लागते - जेव्हा बच्चू कडूंना चहाची तलफ लागते
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - दुपारी साधारण तीनची वेळ. राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथून निघाला असताना राज्यमंत्र्यांची गाडी अचानक गांधी चौक येथील एका चहाच्या टपरी जवळ थांबली. राज्यमंत्र्यांच्या वाहमसमोर असणारी पोलिसांची गाडी चौक पार करून थांबली. अतिशय गजबजलेल्या गांधी चौकात मात्र खळबळ उडाली. नेमकं काय झालं असावं याच्या उत्सुकतेपोटी अनेकांनी बच्चू कडूंच्या भोवती गर्दी केली. बच्चू कडू मात्र 'अरे चहा प्यायचा आहे बनव बरं चांगला', असे म्हणत चहा वाल्याला ऑर्डर दिली. चहावाल्याने बच्चू कडूंना खर्रा वगैरेबाबत विचारत असताना एकाने त्यांच्यासाठी पान आणले. चहानंतर पान तोंडात टाकून त्यांनी चहावाल्याचा मित्राप्रमाणे निरोप घेतला. पाहा, व्हिडिओ...