आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर परप्रांतीय मजुरांची गर्दी - मुंबई लॉकडाऊन
🎬 Watch Now: Feature Video
लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून या चौथ्या टप्प्यात शहरात अडकून बसलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून योग्य ती व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे आझाद मैदान पोलीस स्थानकाच्या बाहेर शेकडो नागरिक जमले होते. शहरातील छोटे-मोठे व्यवसाय बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे आता आम्ही आमच्या घराकडे चाललो असल्याचे बिहारमधील दरभंगा येथील नागरिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...