VIDEO : 60 मजली इमारतीतील 19 व्या माळ्याला भीषण आग - A huge fire on a tower
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईतील लालबाग वरळी परिसरातील एका टॉवरला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. करी रोड येथील अविघ्यान पार्क इमारतीच्या 19 व्या माळ्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडले नाही असे अग्निशमन दलाने सांगितले आहे.