How To Use Aloe Vera For Glow Skin: कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी कोरफड योग्य आहे. त्वचेवरील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि मॉइश्चरायझ करण्यासाठी कोरफडीचा वापर फायदेशीर ठरतो. कोरफडीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. जे मुरुम, काळे डाग, ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यास मदत करते आणि त्वचा चमकदार ठेवते. कोरफडमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, बी, सी, कोलीन आणि फॉलिक ॲसिड मृत पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यास मदत करतात. त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर कसा करू शकता ते पाहू या.
- मध आणि कोरफड: 1 चमचे मध आणि 2 चमचे कोरफड जेल चांगले मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. यामुळे तुम्हाला काळ्या डागांपासून मुक्त होण्यास आणि चमकदार त्वचा मिळविण्यात मदत मिळेल.
- काकडी आणि कोरफड: काकडीवरील साल काढून त्या कापडाच्या मदतीनं त्यातील रस काढून घ्या. यामध्ये २ टेबलस्पून एलोवेरा जेल टाका आणि चांगलं मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेला लावा. १५ मिनिटांनी धुवा. हे त्वचा स्वच्छ करण्यास, ओलावा टिकवून ठेवण्यास आणि सूर्यापासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते.
- ग्रीन टी आणि एलोवेरा: ग्रीन टीची पानं पाण्यात भिजवून ठेवा. तितक्याच प्रमाणात चांगली भिजलेली ग्रीन टीची पाने आणि कोरफड जेल घालून मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलीली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धूवा. यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात. तसंच त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी कोरफड आणि ग्रीन टी फायदेशीर आहे.
- लिंबू आणि कोरफड: एका लिंबाचा रस, 2 चमचे कोरफड जेल चांगलं मिक्स करा. नीट मिक्स केल्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेला लावा. 20 मिनिटांनंतर, कोमट पाण्याने चेहरा धूवा. हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि त्वचेतील घाण काढून टाकण्यास मदत करते.
- व्हिटॅमिन ई आणि कोरफड जेल: एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल 2 चमचे कोरफड जेलमध्ये क्रश करा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यानंतर हे मिश्रण त्वचेवर लावा. सकाळी ते धुवून टाका.
संदर्भ