मकसंक्रांत स्पेशल; जेवणाची चव वाढवणारी 'तिळाची चटणी' - makar sankranti 2021
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - नवीन वर्षाचा पहिला सण जवळ येऊन ठेपला आहे. सगळ्यांच्या डोक्यात यंदाची मकरसंक्रांत कशी साजरी करायची हा विचार चालू असेल. मात्र, सण कितीही नाविण्यपूर्ण साजरा केला तरी मात्र, वर्षानूवर्ष खाद्यसंस्कृती तशीच राहते आणि संक्रांत म्हणलं की तिळाचे पदार्थ आलेच. तसं पाहायला गेलं तर मराठी जेवणात चटणी, लोणची, कोशिंबिरींना महत्वाचं स्थान आहे. कोशिंबिरींमधून जीवनसत्वं मिळतात तर चटण्या आणि लोणची जेवणाची चव वाढवण्याबरोबरच अन्न पचनासाठी मोलाचं काम बजावतात. म्हणूनच मराठी जेवण हे परिपूर्ण असतं असं म्हणतात ते उगीच नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तिळाच्या चटणीची रेसिपी. करायला सोपी आणि दिर्घकाळ टिकाणारी ही चटणी नक्कीच तुमच्या स्वयंपाकाची चव वाढवेल.