'महाराष्ट्र बंद'वर काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाराष्ट्रात बंद सुरू झालेला आहे. या महाराष्ट्र बंदकडे देशाचा समस्त शेतकरी फार मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. देशातला संपूर्ण शेतकरी आणि त्याच्यावर अवलंबून असलेला समाज हा न्यायाच्या अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्र हे न्यायप्रिय राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राने शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी बंद पुकारला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.लोकांचा शेतकऱ्यांच्या संदर्भातला संताप समजून घेतला पाहिजे. जर कोणी म्हणत असेल, की आमचा बंदला पाठिंबा नाही तर त्याने आपण स्वतःला या देशाचे खरंच नागरिक आहोत का? आपण या शेतकऱ्यांचे काही देणे लागतोय का? असा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे असही राऊत यावेळी म्हणाले आहेत.