Devendra Fadnvis On Narayan Rane Notice : नारायण राणेंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे : देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव- राज्यात दरोडेखोरांना पकडायला वेळ नाहीये. बलात्काऱ्यांना पकडायला वेळ नाहीये. सट्टा- पत्ता, दारू, सर्व अवैध धंदे सुरू आहेत. मात्र, या सरकारला नारायण राणे यांच्या घरी जाऊन नोटीस द्यायला वेळ ( Kankavli Police Notice To Narayan Rane ) आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही नारायण राणे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे असल्याचे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ( Devendra Fadnvis On Narayan Rane Notice ) सांगितले. अवैध धंद्यांबाबत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका ( Devendra Fadnavis Criticized MVA Government ) केली. चाळीसगावात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरण सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
TAGGED:
नारायण राणे पोलीस नोटीस