Little Girl Appeal To CM : मुख्यमंत्री साहेब तुमची तब्बेत कशी आहे? तुम्ही एसटीचे विलणीकरण करा; चिमुरडीची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद - ST Worker Strike
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील अडीच महिन्यांपासून राज्यभरातील हजारो एसटी कर्मचारी हे बेमुदत संपावर ( ST Worker Strike ) आहे. या संपात दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबही रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबानी आंदोलने देखील केले आहे. एसटी कर्मचारी संपावर असल्याने त्यांचा पगार देखील एसटी महामंडळाने केला नाही. त्यामुळे हालाखीची परिस्थिती सध्या एसटी महामंडळ कर्मचारी यांच्या कुटुंबीयांची आहे .त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा आक्रोश समोर येत आहे. अशातच आता अमरावतीमधील एसटी चालक कपिल अमृतकर यांची सात वर्षीय मुलगी परी अमृतकर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक साद ( little girl emotional appeal to Chief Minister ) घातली आहे. मुख्यमंत्री साहेब तुमची तब्बेत कशी आहे ? पप्पाचा पगार नाही तर उद्या मला माझ्या वाढदिवसाला सायकल मिळनार नाही. त्यामुळे तुम्ही एसटीचे विलणीकरण करा अशी साद तिने घातली आहे. सध्या तिचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे.