Leopard Catch by Forest Department : येवल्यातील बदापूरला मादी बिबट्या जेरबंद; 15-20 दिवसातील दुसरी कारवाई - मादी बिबट्या ताब्यात येवला वन विभाग
🎬 Watch Now: Feature Video

येवला (नाशिक) - तालुक्यातील बदापूर शिवारात बिबट्याचा (Leopard in Badapur Yeola ) वावर असल्याने वनविभागाने शेतकरी नानासाहेब मोरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये दीड वर्षांची मादी बिबट्याला पकडण्यात आले आहे. ( Leopard Catch by Forest Department Yeola ) गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण कमी होणार आहे. सदर बिबट्या मादीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी ताब्यात घेतले असून निफाड वन क्षेत्राकडे घेऊन गेले आहे.