मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात बिबट्याचा वावर वाढला - गोरेगाव पूर्व
🎬 Watch Now: Feature Video

मागील काही दिवसांपासून मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. गोरेगाव पूर्व येथील एका हाय सोसायटीत रात्रीच्या सुमारास बिंदास्त फिरताना आढळला होता. बिबट्याचा संबंधित सोसायटीत फिरतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण पसरलं होतं. ही घटना ताजी असताना बिबट्यांनं पुन्हा एकदा त्याच सोसायटीत धडक मारली आहे. आपल्या सोसायटीत रात्री बिबट्याचा वावर असतो, ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.