Gondia Car Accident : गोंदियात BMW कारचा भीषण अपघात, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद - कारचा अपघात मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video

गोंदिया - नागपूर वरुन रायपुरला जाणाऱ्या वकीलाच्या BMW कारचा भीषण अपघात झाला आहे. गोंदियातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर देवरी येथील राणी दुर्गावती चौकात जैन मंदिर जवळ हा अपघात झाला. यामध्ये कार अनियंत्रित झाल्याने विरुद्ध दिशेला असलेल्या उभ्या ट्रकला धडक देत पटली झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, यामध्ये कोणीतीही जिवीतहानी झाली नाही.