VIDEO : जोडुन आलेल्या सुट्ट्यांमुळे साई दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी - साईबाबा
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी - कोरोनाची लाट आणि नागरिकांवर असलेल्या बंधनाच्या शिथीलतेनंतर शिर्डीतील रस्ते आज प्रथमच गजबजुन गेल्याचे बघावयास मिळाले. साई मंदिरात दर्शन रांगाही फुल्ल झाल्या होत्या. कोरोनाच्या दोन वर्षानंतर आता शिर्डीची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सावरू लागल्याचे दिसुन येत आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर 7 ऑक्टोबरपासून साई मंदीर भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. शिर्डीत आलेल्या भक्तांच्या सुविधेसाठी आता ऑफलाईन पासेसही देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शिर्डीतही आता हळु-हळु गर्दी होण्यास सुरूवात् झाली आहे. गुरुनानक जयंती, शविवार आणि रविवार अश्या जोडुन सुट्या आल्याने शिर्डीत भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे बघावास मिळत आहे.