क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं, हमाम में ... - मंत्री जितेंद्र आव्हाड - jitendra awahd on kranti redkar
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये माझी जाण्याची इच्छा नाही. मात्र, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावे. मी त्यांना एवढेच सांगेन 'मागचा इतिहास काढला तर सगळेच हमाम मे सब नंगे है', अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तर तसेच समीर वानखेडेंचे शेड्युल कास्ट सर्टिफिकेट बोगस आहे, हे जर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार मान्य करत असतील तर याचा अर्थ ते भाजपची भूमिका स्पष्ट करत आहेत, असेही ते म्हणाले.
Last Updated : Oct 27, 2021, 8:37 PM IST