मराठमोळ्या 'दंगल गर्ल'चा गाव ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनोखा प्रवास - Marathi Dangal Girl
🎬 Watch Now: Feature Video
खडकेवाडा या कागल तालुक्यातील मेंढपाळाच्या मुलीने कुस्तीसारख्या क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावले आहे. शिवानी मेटकर असे नाव असलेल्या १४ वर्षाच्या मुलीने अलिकडेच बालेवाडीत झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली. सामान्य धनगराच्या मुलीच्या या अचाट जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.