कोरोना व्हायरस: 'मुंबईकरानो घाबरू नका, सूचनांचे पालन करा' - कोरोना व्हायरस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6374359-thumbnail-3x2-mum.jpg)
मुंबईकरानो घाबरू नका, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करा, कस्तुरबा रुग्णालयात सर्व यंत्रणा सज्ज आहे. कोरोनाचे दोन्ही रुग्ण पुणे आणि सौदी येथे जाऊन आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. इतर लोकांना याची बाधा होऊ नये म्हणून पालिका सज्ज आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून कब्बडीच्या 'महापौर चषक स्पर्धा' रद्द केल्या आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील दोन्ही रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.