बाबाजी का लंगर..! लॉकडाऊन काळात गरजूंसाठी २४ तास खुला, 20 लाख वाटसरूंची भागवली भूक - खैरा बाबाजी लंगर करंजी यवतमाळ
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ/वर्धा- करंजी गावापासून काही अंतरावर असलेल्या गुरुद्वारातून मागील दोन महिन्यांपासून अन्न वाटप केले जात आहे. 'करनैल सिंग खैरा' नावाचे 81 वर्षांचे बाबाजी या गुरुद्वारामध्ये सेवा देत आहेत. नांदेडपासून पंजाबपर्यंत 'खैरा बाबाजी' अशीच त्यांची ओळख आहे. तेजस्वी चेहरा, स्मित हास्य आणि निस्वार्थ मानवसेवा, हाच मूलमंत्र घेऊन ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रचेच झाले. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ते 24 तास 'गुरू का लंगर' चालवत आहेत आणि रस्त्यावरून पायपीट करत जाणाऱ्या मजुरांची भूक भागवत आहेत. आजतागायत 20 लाख अन्नाच्या ताटांचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले आहे.