कल्याण-डोंबिवली : कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची भीती कायम - कल्याण-डोंबिवली बातमी
🎬 Watch Now: Feature Video
कल्याण-डोंबिवली (ठाणे) - कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाकडून ते मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नातेवाईकांना अंत्यविधीसाठी देत होते. मात्र, काहींनी मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीतून काढून त्याला अंघोळ घालणे तसेच सामान्यांप्रमाणे अंत्ययात्रा काढणे, असे प्रकार केले. परिणामी कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने हद्दीतील सहा स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीसाठी ठेकेदार नेमले आहेत. यामुळे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यासोबत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने बातचित केली आहे.
Last Updated : Dec 20, 2020, 10:24 PM IST