आदिवासी समाजाचे उगमस्थान असलेल्या 'कचारगड' यात्रेला सुरुवात
🎬 Watch Now: Feature Video
आदिवासी समाजाचे उगम स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी गुहेच्या स्थानावरील यात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील नक्षलग्रस्थ भागातल्या सालेकसा तालुक्यात कचारगड येथे दरवर्षी ही यात्रा कोयापुणेम पौर्णिमेला भरते. या यात्रेसाठी भारतातील तब्बल 18 राज्यातून आदिवासी बांधव एकत्रित येतात. गेल्या अनेक वर्षांपासून भाविक या ठिकाणी आपली संस्कृती जपत आहेत.