#JantaCurfew: दादरमध्येही व्यक्त केली कृतज्ञता - COVID 9
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता आरोग्य सेवा व इतर प्रशासकीय सेवा यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु दरम्यान रविवारी (दि. 23)सायंकाळी 5 वाजता थाळीनाद, टाळ्या, शंखनाद करण्याचे आवाहन केले होते. यावेळी दादर येथील नागरिकांनी टाळ्या वाजवून तसेच थाळ्यांचा नाद करून परिचारिका, पोलीस, रेल्वे-बस कर्मचारी, घरपोच सेवा देणारे लोक स्वत:ची पर्वा न करता जनतेची सेवा करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी कौतुक केले.