VIDEO : या शेंगदाण्या-फुटाण्याला काही काम राहिले नाही; नितेश राणेंवर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांची टीका
🎬 Watch Now: Feature Video
जालना - शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याविरोधात भडकावू भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी पोलिसांकडे केली आहे. (nitesh rane and arjun khotkar news) यावर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता या फुटाण्या-शेंगदाण्याला काही काम राहिलं नसून हे किती बेअकली लोक आहे, हे यावरून समोर आल्याचं खोतकर यांनी म्हटलं आहे. (arjun khotkar criticize mla nitesh rane) अर्जुन खोतकर यांनी नांदेडमध्ये दंगल भडकवली असा त्यांचा आरोप आहे. मात्र, मी नांदेडला गेलोच नाही. मी जालन्यातील रजा अकादमीच्या मोर्चात जाऊन तिथे शांतता आणि सलोखा राहण्याचं आवाहन केलं, असंही खोतकर म्हणाले. मी नांदेडला गेलोच नव्हतो असा निरोप त्यांना समजल्यानंतर आता भाजप नेते तोंडघशी पडले आहेत. मी भाजपच्या लोकांना जालन्यात घुसू न दिल्यानं जालन्यात दंगल झाली नाही अन्यथा जालन्यात देखील अमरावतीसारखी दंगल झाली असती, असे खोतकर म्हणाले. जालन्यातील मोर्चात मी असल्याने दंगल झाली नाही, ही भाजपची खरी पोटदुखी आहे, असा टोलाही खोतकर यांनी लगावला आहे.