ETV Bharat / politics

"सत्ता येणार नसल्याची खात्री, म्हणूनच 'व्होट जिहाद'चा वापर", शरद पवारांचा थेट फडणवीसांवर निशाणा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात महाविकास आघाडीच सत्तेवर येणार असल्याचा ठाम विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसंच यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही हल्लाबोल केला.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
शरद पवार, देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2024, 10:49 PM IST

सातारा : आपलं सरकार येत नाही, याची खात्री झाल्यामुळंच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतोय, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला. हिंदू-मुस्लिम समाजातील चांगलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्ही त्याच्या एकदम विरोधी आहेत, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांना उपरोधिक टोला : 'शरद पवार साहेबांनंतर मीच वाली आहे', असं अजित पवार सांगत आहेत. त्याबद्दल विचारलं असता, " कुणी म्हणत असेल की मीच देशाचा प्रमुख आहे तर म्हण बाबा. माझी काही तक्रार नाही. पण, हे लोकांनी म्हटलं पाहिजे. स्वतः म्हणून काय उपयोग," अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना उपरोधिक टोला लगावला.

शरद पवार यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

राज्यातील सामाजिक परिस्थिती गंभीर : राज्यात सामाजिक वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढू लागलं आहे. रोजगार नसल्यामुळे तरूणांमध्ये नैराश्याचं वातावरण आहे. हे सर्व पाहता राज्यातील सामाजिक परिस्थिती गंभीर असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

जनता मविआला कौल देईल : लोकसभेप्रमाणे जनता मविआला कौल देईल. विधानसभा निवडणुकीत 'लाडकी बहीण योजने'चा किती परिणाम होईल, या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "लाडकी बहीण फार परिणाम होणार नाही. कारण मागील दोन-तीन वर्षात राज्यातील महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलंय. गेल्या दोन वर्षात अत्याचाराच्या ६७ हजार ३८१ घटना घडल्याची सरकारी आकडेवारी सांगते. तसेच बेपत्ता मुली, महिलांची आकडेवारी ६४ हजार आहे. यावरून महिला सुरक्षिततेची गरज लक्षात येते."

मी ज्योतिषी नाही, पण... : "निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही पाऊले टाकली आहेत आणि महाराष्ट्रातील जनता आमच्या बाजूने कौल देईल. महाविकास आघाडीच्या मागे उभे राहील," असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. "महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, मुख्यमंत्री कोण होईल, या प्रश्नावर 'मी काही ज्योतिषी नाही'," असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.

हेही वाचा

  1. नागपुरात राहुल गांधींनी बनवले तरी पोहे अन् मारला ताव; पाहा फोटो
  2. 'व्होट जिहाद, हिंदू- मुस्लिम' वादावरून राजकारण तापलं, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
  3. "गरिबांना 25 लाखांचा आरोग्य विमा, महिलांना मोफत प्रवासासह..."; राहुल गांधींकडून घोषणांचा पाऊस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.