ETV Bharat / bharat

रामोजी राव यांच्या 88व्या जयंतीनिमित्त 'मार्गदर्शी'च्या आणखी तीन शाखांचं उद्घाटन

रामोजी ग्रुपचे अध्यक्ष दिवंगत रामोजी राव यांच्या जयंतीनिमित्त 'मार्गदर्शी चिट फंड'नं तेलंगाणामध्ये तीन नवीन शाखांचा विस्तार केला.

MARGADARSI 3 NEW BRANCHES
'मार्गदर्शी चिट फंड'च्या नवीन शाखांचं उद्घाटन (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

हैदराबाद : रामोजी ग्रुपचे अध्यक्ष दिवंगत रामोजी राव यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त 'मार्गदर्शी चिट फंड'च्या तीन नवीन शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. 'मार्गदर्शी चिट फंड'च्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांनी ऑनलाइन पद्धतीनं तिन्ही शाखांचं उद्घाटन केलं. वानापर्थी, शमशाबाद आणि हस्तिनापुरम येथे स्थापन झालेल्या शाखांचं शैलजा किरण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सहा दशकांहून अधिक काळ सेवा देत असलेल्या 'मार्गदर्शी चिट फंड'नं चार राज्यांमध्ये 118 शाखांचा विस्तार केला आहे.

'मार्गदर्शी'च्या तीन नवीन शाखा : शैलजा किरण यांच्याकडून आज सकाळी वानापर्थी येथील 116 व्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. तर दुपारच्या सुमारास शमशाबाद मंडळ रंगारेड्डी जिल्ह्यातील रल्लागुडा येथील 117 व्या आणि हस्तिनापुरम येथील 118 व्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. उपाध्यक्ष राजाजी यांच्यासह सीईओ सत्यनारायण आणि शाखा व्यवस्थापक अरुण कुमार यांनी दीपप्रज्वलन केलं. संचालक व्यंकटस्वामी उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

'मार्गदर्शी चिट फंड'च्या नवीन शाखांचं उद्घाटन (Source - ETV Bharat)

"आज रामोजी राव यांच्या जयंतीनिमित्त आम्ही वानापर्थी, शमशाबाद आणि हस्तिनापुरम येथं नवीन शाखा सुरू केल्या आहेत. आमचे कर्मचारी अधिकाधिक लोकांना मार्गदर्शन आणि आर्थिक सेवा देण्यासाठी सतत कार्यरत आहेत. मार्गदर्शी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. - शैलजा किरण, मार्गदर्शी चिट फंडच्या व्यवस्थापकीय संचालक

अनेक राज्यांमध्ये पसरलं जाळं : आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मार्गदर्शीच्या शाखांचं मजबूत नेटवर्क आहे. मार्गदर्शी कंपनीनं विश्वास, पारदर्शकता आणि आर्थिक सक्षमीकरणाचा आपला वारसा कायम जपला आहे. या नवीन शाखांचा शुभारंभही या प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

हेही वाचा

  1. रामोजी राव : एक स्वप्न पाहणारे महान व्यक्तिमत्व ज्यांनी सर्वांसाठी भविष्य घडवले
  2. 'सबला मिलेट्स-भारत का सुपर फूड' रामोजी ग्रुपने रामोजी फिल्म सिटीमध्ये केले लाँच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.