राजस्थानमधील इतिहासाचा साक्षीदार अजमेरचा किल्ला - 75 years of independence
🎬 Watch Now: Feature Video
अजमेर - शहरातील मध्यभागी अजमेर किल्ला असून, तो अकबरच्या शासनकाळात हा बनवण्यात आला होता. देशात इंग्रजांचा शासनकाळ याच किल्ल्यापासून सुरू झाला होता. 1616 मध्ये इंग्लंडचा राजा पहिला जेम्स याने मुघल सम्राट जहांगीरची भेट घेतली होती. या भेटीचा हेतू व्यावसायिक संधीची परवानगी घेण्यासाठी होता. ईस्ट इंडिया कंपनीला सुरत आणि देशातील इतर ठिकाणी कारखाना लावण्यासाठी परवानगी पाहिजे होती. अनेक बैठकांनंतर जहांगीरने परवानगी दिली. यानंतर जो भारताचा इतिहास बदलला तो आपल्यासमोर आहे. तेव्हा कारखाने लावण्यासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीचा खरा हेतू कोणालाच माहित नव्हता. त्यांना या देशावर राज्य करायचे होते. हळू हळू ईस्ट इंडिया कंपनीने संपूर्ण देशात आपले राज्य प्रस्थापित केली.