अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने कांदा आणि संत्रा बागांना फटका - अवकाळी पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
विदर्भातील वातावरणात गेल्या दोन दिवसांपासून बदल झाला आहे. शनिवारी मध्यरात्री रात्री अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला कांदा पुन्हा अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडला आहे. तर संत्रा बागांना आलेला नवीन बहार गळून पडल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.