कोल्हापूर : इराणी खणीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन; परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त - कोल्हापूर इराणी खणीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कोल्हापूर शहरात दरवर्षी हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्यातल्या बहुतांश मूर्तींचे येथील इराणी खणीमध्ये विसर्जन केले जाते. आज सुद्धा सकाळपासून गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी याठिकाणी दाखल झाले आहेत. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी परवानगी नाही. शिवाय महानगरपालिका प्रशासनाकडून सुद्धा शहरातील विविध भागांत 160हून अधिक पर्यावरणपूरक विसर्जन कुंड बनविण्यात आले आहेत. त्यामध्ये नागरिक विसर्जन करत आहेत. सकाळपासून इराणी खणीमध्ये 100 हून अधिक मूर्तींचे विसर्जन झाले असून आता सायंकाळी भक्तांची गर्दी वाढू लागली आहे.