VIDEO : किरीट सोमैया यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखाल तर.. राम कदमांचा सरकारला इशारा - किरीट सोमैया
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13112060-thumbnail-3x2-ram-kadam.jpg)
किरीट सोमैया यांना कोल्हापूरला जाण्यापासून राज्य सरकारने रोखले तर याद राखा, असा इशारा आमदार राम कदम यांनी दिला आहे. सोमय्यांना कोल्हापूरमध्ये येण्यास मज्जाव केल्यास राज्यभरातील भाजप कार्यकर्ते कोल्हापुरात येतील, अशी भूमिका राम कदम यांनी मांडली आहे.
किरीट सोमैया आघाडी सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा अजून एक घोटाळा बाहेर काढणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बळाचा वापर करून भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांचा आवाज दडपू पाहत आहे. पण ही दडपशाही चालणार नाही. भाजपा पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज दडपता येणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिला. राज्यातील लोकशाही संपली का? असा सवाल करून चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही चालणार नाही. या सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही आणि किरीट सोमैया हे सुद्धा घाबरत नाहीत. भाजपा किरीट सोमैया यांच्या पाठीशी आहे. मुंबईत घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नातील दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून पकडले जाते. महाविकास आघाडीच्या राज्यात दहशतवादी मोकळेपणाने फिरतात आणि किरीट सोमैया यांच्या घराबाहेर मात्र दीडशे पोलिसांचा वेढा घातला जातो, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी सरकारला लगावला.
Last Updated : Sep 19, 2021, 10:40 PM IST