Husband Wife Quarrel : नवऱ्याने भर रस्त्यात बायकोची मान धरून खाली आपटले - कौटुंबिक वादातून भांडण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 5, 2022, 9:11 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला भर रस्त्यात आपटल्याची घटना घडली ( Husband Beats Wife ) आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी ( Nigadi Police In Pune ) मध्यस्ती करत दोघांना पोलीस ठाण्यात बोलावले. पत्नीला पती विरोधात तक्रार आहे का? विचारण्यात आलं. मात्र, पत्नीने तक्रार देण्यास नकार दिला. दरम्यान, कौटुंबिक वादातून भांडण ( Conflict Over Family Disputes ) झाल्याने त्यांचं समुपदेशन करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे. ही घटना दोन जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी परिसरात पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणामधून पतीने पत्नीला थेट रस्त्यावरच आपटले आहे. ही घटना दोन जानेवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. याचा सीसीटीव्ही निगडी पोलिसांपर्यंत पोहचला. पोलिसांनी पती आणि पत्नीचा शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. एकमेकांना विचारणा करण्यात आली अन पत्नीला पती विरोधात काही तक्रार आहे का? अस विचारण्यात आलं. मात्र, पती विरोधात तक्रार नसल्याचं सांगत हे कौटुंबिक वाद आहेत, असं पत्नीने पोलिसांना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.