देशातील कोरोना प्रतिबंधक लसीची पुण्यात पहिली मानवी चाचणी - first corona vaccine trial news
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना, कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी जगभरातून प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अॅस्ट्राझेनेको आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहभागातून कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यात आली आहे. या लसीची पहिली मानवी चाचणी आज(बुधवारी) पुण्यात पार पडली. पुण्यातील भारती रुग्णालयामध्ये एका स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली आहे.