चेंबूर दुर्घटना : दरड कोसळल्याने छत गेले अन् उपजीविकेचे साधनही.. जगायचे कसे ? - मुंबई जिल्हा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - चेंबूर येथील भारत नगर परिसरात शनिवारची (दि. 17 जुलै) रात्र काळरात्र ठरली. कोसळणाऱ्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. कालपर्यंतचा आज एकदम शांत झाला. कोसळणार्या पावसामुळे चेंबूर परिसरात भारत नगरला लागून असलेल्या डोंगरावरुन रात्री दरड कोसळली. यात अनेक घरांची पडझड झाली. बचाव कार्य करण्यासाठी यंत्रणा पुढे सरसावल्या. यामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला. काहींच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. याच परिसरातील एका पीडितेच्या घरावर दरड कोसळल्याने त्यांच्या उपजिवीकेचे साधन असलेले शिलाई मशीन ढिगाऱ्याखाली गेले. टाळेबंदीमुळे पतीच्या हाताला काम नाही. शिलाई मशीनद्वारे उपजीविका चालत होती. पण, शिलाई मशीन नाही त्यात डोक्यावर छत नाही. त्यामुळे जगावे कसे हा प्रश्न पीडिते समोर उभा ठाकला आहे.