जाती-धर्माच्या भिंती मोडून कोल्हापूरात पार पडला हिंदू-मुस्लिम विवाह सोहळा - हिंदू-मुस्लिम विवाह सोहळ्या बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी खास पाहायला मिळते. याच पुरोगामी विचारांना चालना देण्याचे काम कोल्हापुरातील मुजावर आणि यादव कुटुंबीयांनी केले आहे. जाती आणि धर्माच्या भिंती मोडून अगदी थाटात या दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या मुलांचे लग्न लावून दिले आहे. मुलगा हिंदू धर्मीय तर मुलगी मुस्लिम आहे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या या कुटुंबांनी एकाच मंडपात हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने आपल्या मुलांचा लग्नसोहळा पार पाडला. या दोन पद्धतीच्या एका लग्नामागची गोष्ट काय आहे, त्याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपार्ट...