thumbnail

By

Published : Nov 19, 2021, 7:00 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार....; तिरुमलामध्ये भूस्खलन तर चित्तूर जिल्ह्यात चार महिल्या गेल्या वाहून

कलिकीरी (आंध्रप्रदेश) - कालिकिरी येथील मदनपल्ले-तिरुपती मुख्य रस्त्यावरील कालिकिरी मोठ्या तलावात पाण्याचा जोर वाढल्याने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली. मुसळधार पावसामुळे तिरुमला येथे भूस्खलन झाले. (landslide in tirumala) परिस्थिती धोकादायक असल्याने तिरुमाला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) (Tirumala Tirupati Devasthanams) तिरुमला येथील दोन घाट दोन दिवस बंद केले. सीएम जगन यांच्या आदेशानुसार रस्ते बंद करण्यात आल्याचे टीटीडीने सांगितले. त्यामुळे कपिलतीर्थ-थिरुमला बायपास रोडवर शेकडो वाहने अडकून पडली होती. टीटीडीने सांगितले की, भाविकांनी तिरुमला येथे येऊ नये. तिरुमला घाट रस्त्याची टीटीडीचे ईओ जवाहर रेड्डी यांनी पाहणी केली. काल चित्तूर जिल्ह्यातील बालीजेपल्ली तलावाच्या पुराच्या पाण्यात बंगारुपल्लम मंडल टेकुमंदा येथील चार महिला वाहून गेल्या. त्यापैकी एकाचा मृतदेह आज (19 नोव्हेंबर) सापडला. आणखी तीन महिलांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.