वाशिममध्ये मुसळधार पाऊस; पाझर तलावाला पडले भगदाड तर काही गावांचा तुटला संपर्क - many villages connection disconnected
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12544499-thumbnail-3x2-kk.jpg)
वाशिम - जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्री मंगरुळपीर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वटफळ आणि कुंभी गावाशेजारील असलेला पाझर तलावाला मोठे भगदाड पडले. त्यामुळे पाझर तलावाखाली असलेली शेती खरडून गेली आहे. तर मानोरा तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पूस नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे रुई, गोस्ता ते वटफळ या गावाचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे भंडारी, राजना, ब्राम्हणवाडा गावचाही संपर्क तुटला आहे.