Health Minister Rajesh Tope : दक्षिण अफ्रिकेतील नव्या व्हेरिअंटचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम नाही - आरोग्यमंत्री - Mayor Kishori Pednekar
🎬 Watch Now: Feature Video
जालना - राज्यातील 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत त्यावर दक्षिण अफ्रिकेत नवा व्हेरिअंट आढळला असला तरी त्याचा परिणाम आताच होणार नाही आहे. त्यामुळे याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो उद्या ( रविवारी ) होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सांगितले की, बाहेर देशातून येणाऱ्या नागरिकांवर आपण वाच ठेऊन आहोत. त्यांची सर्व प्रकारची तपासणी करत आहोत. जर हा व्हेरिअंट जास्त धोकादायक असेल तर आपण त्या देशातील विमाने बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रालाही पत्र पाठवले आहे. असे त्यांनी बोलतांना सांगितले. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याच्या सर्व चाचण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Last Updated : Nov 27, 2021, 4:20 PM IST