आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते अॅनिमीया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ - विरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र
🎬 Watch Now: Feature Video
जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांच्या हस्ते आज जालन्यातील विरेगाव येथे अॅनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ ( Anemia Free Village Statewide Campaign ) करण्यात आला. विरेगाव मधील प्राथमिक आरोग्य केंद्रातून ( Viregaon Primary Health Center ) या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, आशासेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचतगटाच्या सदस्य यांची देखील उपस्थिती होती.' अॅनिमिया मुक्त भारत' मोहीम राबवून राज्यातील प्रत्येक गाव अनिमियामुक्त होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना देखील केल्या जातील असं आश्वासन यावेळी टोपे यांनी दिले.