नांदेड सचखंड गुरुद्वारामध्ये हल्ला-महल्ला कार्यक्रम उत्साहात!

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 15, 2021, 9:16 PM IST

नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारामध्ये दसरा सण आणि हल्लाबोल कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. दसरा सणानिमित्त सचखंड गुरुद्वाराच्या वतीने प्रतिकात्मक हल्ला-महल्ला हा पारंपरिक कार्यक्रम साजरा केला जातो. शीख भाविक शस्त्रांसह प्रतिकात्मक हल्ला चढवतात. यालाच शिख धर्मामध्ये हल्ला-महल्ला म्हटलं जातं. त्यापुर्वी सचखंड गुरुद्वारात अरदास करुन नगर किर्तन यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पंचप्यारे साहेबान, गतका पथक, भजन मंडळ, गूरु महाराजांचे घोडे, हत्ती सहभागी झाले होते. नगर किर्तन हल्ला बोल चौकात आल्यानंतर अरदास करून हल्ला-बोल करण्यात आला. नवरात्रीत सचखंड गुरुद्वारात नऊ चंडीचा पाठ केला जातो. त्यानंतर दसरा सणाच्या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते. आणि हल्ला-महल्ला करण्याची प्रथा आहे. मागील तीनशे वर्षांपासून हल्ला बोल करण्याची प्रथा नांदेडमध्ये जोपासली जाते. असत्यावर सत्याचा विजय म्हणून दरवर्षी मिरवणूक काढून प्रतिकात्मक हल्ला महल्ला केला जातो. तीनशे वर्षापूर्वी शिखांनी जे युद्ध लढले होते. ते सत्यासाठी लढले. त्याच लढायांच प्रतीक म्हणून प्रतीकात्मक हल्ला-महल्ला कार्यक्रम केला जातो.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.