राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दरडग्रस्त तळीये गावाला भेट - landslide affected Taliye village
🎬 Watch Now: Feature Video
रायगड - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये कोंडाळकर वाडीला भेट दिली. येथे त्यांनी दुर्घटनेची पाहणी केली, तसेच शोध, बचाव कार्य आणि सद्यःस्थितीची माहिती घेतली. ग्रामस्थांशी देखील त्यांनी चर्चा केली. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींना राज्यपालांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे उपस्थित होते. ही दुर्घटना अभूतपूर्व अशी आहे. अशा दुर्घटना क्वचितच घडतात. संपूर्ण गाव आणि कुटुंब नष्ट होणे ही खूपच दुर्दैवी बाब आहे. आपल्या सर्वांनाच याचे दुःख आहे. पंतप्रधानांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्रीदेखील भेट देऊन गेले. पुढील काळात केंद्र आणि राज्य सरकार मिळून या गावाचे सुयोग्य पद्धतीने पुनर्वसन करतील. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे, आहे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.